पुरंदर ! गुळुंचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा ५ टक्के लाभांश वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी 
गुळुंचे विविध कार्यकारी सोसायटी चा आज ग्रामपंचायत गुळुंचे या ठिकाणी पुरंदर चे मा.सभापती अजितदादा निगडे यांचे हस्ते ५ टक्के लाभांश वाटप करणेत आला 
       गुळुंचे सोसायटी च्या इतिहासात प्रथमच लाभांश वाटप झाल्याने व सोसायटी ची वाटचाल दमदार झाले बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कांचनदादा निगडे यांनी सोसायटी चे चेअरमन प्रा.सतीश उर्फ राजेंद्र निगडे यांना सन्मानित केले,व संचालक मंडळाचे अभिनंदन केले 
या वेळी संस्थेचे तज्ञ संचालक तानाजी निगडे यांना ही गुळुंचे गावचे मा उपसरपंच जालिंदर निगडे  व संस्थेचे सचिव रामचंद्र कर्णवर यांना सन्मानित केले .
यावेळी अजितदादा निगडे  व कांचनदादा निगडे यांनी सभासदांना संबोधित केले 
अजित निगडे म्हणाले की , "तसं पाहिलं तर शंभरीकडे वाटचाल असलेली ही सोसायटी अनेक बुजुर्ग अनेक पिढ्या या सोसायटीने पाहिल्यात आपल्या आर्थिक जडणघडनितील ही सोसायटी अनेकांच्या प्रपंचासी निगडित असलेने चेअरमन व संचालक यांनी खूप काटकसरीने या संस्थेकडे पाहून सोसायटी प्रगतीपथावर आणली या मध्ये अनुभवी सभासदांची ही मोलाची साथ आहे ,संस्थेला चेअरमन म्हणून प्रा राजूसर योग्य निवड असल्याचं त्यांनी सांगितलं ,चुकीचं कोणतं ही काम करू नका ,कोणाची अडवणूक करू नका ही परंपरा पुढं चालू ठेवत आहात या बाबत समाधानी आहे ,लाभांश वाटपाची कमान ही दरवर्षी वाढती पाहिजे ती वजा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी आवर्जून सांगितलं. 
         तर कांचनदादा निगडे म्हटले की अजितदादा निगडे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी पारदर्शक पणाने चालू आहे , सोसायटीला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा    व शरद पवार साहेबांचे काळातील मोठी  कर्ज माफीचा संस्था नफ्याकडे येण्यास फार मोठा हातभार लागला असून या वर्षीचा मिळालेला लाभांश हा मागील व आत्ताचे संचालक मंडळ व विशेषतः प्रा राजूसर यांची मेहनत फळास आली ही परंपरा पुढं अशीच चालू राहावी यासाठी पीक कर्जा बरोबर मध्यम मुदतीची कर्जे वाढली तरंच संस्था मोठी होईल केवळ पीक कर्ज वाटून संस्था उद्धिष्ट गाठू शकत नाही त्यासाठी मध्यम मुदतीची कर्जे वाढवली पाहिजेत तरंच लाभांश वाटपाची परंपरा पुढं चालू राहील जे सभासद थकीत आहेत त्यांना कायदेशीर नोटीस व दारात गाडी उभी करनेपेक्षा त्यांना सर्वांनी मदत करत त्यांना कसं बाहेर काढता येईल हे पाहिलं पाहिजे. 
        प्रस्तावित प्रा राजेंद्र निगडे यांनी मानले तर आभार बाळासाहेब रघुनाथ निगडे यांनी मानले
उपस्थिती मध्ये संस्थेचे संचालक अनिल निगडे ,पोपट निगडे, किसन कुंभार,संभाजी निगडे ,कुंडलिक निगडे राजेंद्र निगडे,बबलू निगडे,सागर निगडे  व सभासद उपस्थित होते
यावेळी गुळुंचे विविध कार्यकारी सोसायटी च्या वतीने पुरंदर पंचायत समितीचे मा सभापती अजितदादा निगडे यांना संस्थेचे चेअरमन राजेंद्र निगडे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व सभासद कांचनदादा निगडे ,तज्ञ संचालक तानाजीकाका निगडे ,संचालक अनिल जी निगडे ,राजाभाऊ निगडे,सागर निगडे यांनी सन्मानित केले. 
To Top