सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई शहरालगतच्या ग्रामीण भागात बंद घरे फोडून चोरीचा प्रयत्न झाला, गंगापुरी, सुलतानपूर, मेणवली, भोगाव, आसरे, वेलंग, परखंदी, आदी भागातील अनेक बंद घरे चोरट्यांकडून फोडण्यात आली. पोलिसांनी दिवाळी पूर्वी जनजागृती केल्याने चोरट्यांचा हाती मात्र काहीच लागले नाही.वाई पोलिसांनी सातारा येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दिवाळी सुट्टीत घरे बंद करून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
ऐन दिवाळीत वाईच्या ग्रामीण भागात बंद घरांची रेकी करून अज्ञात टोळक्यांनी हि घरे आणि गंगापुरी येथील स्वामी समर्थ मठ फोडण्यापर्यंत चोरट्यांनी धाडस केले.
शहरातील गंगापुरी, सुलतानपूर, मेणवली, भभोगाव, आसरे, वेलंग, परखंदी या शहरालगतच्या ग्रामीण भागातील बंद घरे हुडकून कुलूप कोयंडे तोडून चोरटे घरात घुसले.मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.दिवाळी पूर्वी पोलिसांनी दिवाळीत होणाऱ्या चोऱ्यांबाबत नागरींक व ग्रामस्थांना अलर्ट केले होते. यामुळे नागरिकांनी पुरेपूर काळजी घेतली.
चोरट्यांचा ठाव ठिकाणा लवकरच लागेल असे पोलिसांनी सांगितले.चोऱ्या झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सातारा येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.त्यांनीचोरट्यांचे ठसे मिळविले आहेत.यापूर्वी या प्रकारच्या चोऱ्या जिल्ह्यात या चोरट्यांनी केल्या आहेत. त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीत घर बंद करून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.घरात मौल्यवान ऐवज ,रोख रक्कम ठेवू नये.घराबाहेर जाताना शेजार पाजारच्या लोकांना सांगावे.अनोळखी लोक विनाकारण फिरताना दिसल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
_______________________________________
पोलिसांनी सोशल मीडिया,ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना केलेल्या आवाहनाला मोठा फायदा नागरिक व ग्रामस्थांना झाला.यामुळे नागरिकांनी आपल्या ऐवज ,रोख रक्कमेची काळजी घेतली आणि आजच्या चोरट्यांच्या तावडीतून ऐवज वाचल्याचे गंगापुरीतील महिलेने सांगितले असे बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक, वाई यांनी सांगितले.पोलिसांनी केलेल्या आवाहनाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.