सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील ३२० शासकीय कर्मचारी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिपावली निमित्त मिठाई वाटप करण्यात आली. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना दीपावलीची मिठाई भारतीय जनता पार्टी भोरच्या वतीने वाटप केली जाते.यंदाही गतवर्षी प्रमाणे भोर पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय रामबाग,एल.डी.भावे गॅस एजन्सी कर्मचारी व भोर नगरपालिका सफाई कामगार यांना मिठाई वाटप केले गेले.भोर शहराध्यक्ष सचिन मांडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी अध्यक्ष भोर शहर महिला आघाडी स्वाती गांधी,माजी नगराध्यक्षा दिपाली शेटे, संपर्कप्रमुख महाराष्ट्र ओबीसी आघाडी पंकज खुर्द, संतोष लोहकरे, विजयकुमार वाकडे ,कपिल दुसंगे अमर ओसवाल आदींसह भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.