भोर ! आ.थोपटेंचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून हे उपक्रम पूर्णतः ७ दिवस सुरू राहणार आहेत.तर अभिष्टचिंतन सोहळा हा समाज हितासाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांनी दिली.                      
            थोपटे यांचा वाढदिवसाच्या निमित्त १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर भोर-वेल्हा-मुळशीमध्ये आरोग्य शिबिर, कुस्ती स्पर्धा, भजन स्पर्धा, रक्तदान शिबिर, होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा स्पर्धा), रोजगार मेळावा, अनाथ आश्रम शाळा व वृध्दाश्रमास वस्तूंचे अन्नधान्य वाटप, अखिल वारकरी व किर्तनकार यांचा सन्मान असे विविध कार्यक्रम संपुर्ण सप्ताहात  होणार आहेत
To Top