सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांनी दिवाळीनिमित्त परीसरातील १६५ नागरिकांना क्राऊन कंपनीचा ४० इंची टीव्ही व चक्की आटा वाटप करण्यात आले.
निंबुत ता बारामती येथे आज पडाव्या दिवशी साहेबरादादा सोसायटीच्या प्रांगणात वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, मदन काकडे, राजकुमार बनसोडे, विक्रम काकडे, मधुकर काकडे, अजित काकडे, तुषार फरांदे, योगेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सोमेश्वर कारखान्याचे अभिजित काकडे हे नेहमी परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवित असतात. आज त्यांनी ४० इंची व ३२ इंची क्राऊन कंपनीचे २२ हजार ८०० रुपये किंमत असणारे टीव्ही अवघ्या १० हजार रुपयात असे १०० टीव्हीचे वाटप करण्यात आले. तर १६ हजार ६०० किंमत असणारी चक्की आटा मशीन अवघ्या ८ हजार रुपये किंमतीत ६५ लोकांना वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त अभिजित काकडे युवा मंचाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जात असून दिवाळीनंतर गोर गरीब मजुरांना ३ हजार ३३३ किलो साखरेचे वाटप करण्यात आले. तसेच हॉलीबॉल सामने, इफ्तार पार्टी, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम राबविले जातात. तसेच दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते.
आजच्या कार्यक्रमासाठी सुमित काकडे यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मदन काकडे यांनी मानले.