भोर ! विसगाव खोऱ्यातील शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे व खानापूर केंद्रामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती तसेच वाचन प्रेरणा दिन साजरा केला.तर याचवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालवडी येथील मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी वृत्तपत्र दिनानिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला.
       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे व बालवडी येथे विद्यार्थ्यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामूहिक वाचन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य शाळांचे मुख्याध्यापक उपशिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top