सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
नेरे ता.भोर येथील बुजुर्ग प्रवचनकार ह.भ.प. गोपाळ गोविंद म्हस्के वय-७० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी,दोन मुलगे, एक मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे.गोपाळ म्हस्के यांनी उभे आयुष्य सांप्रदायिक क्षेत्रात घालवले असून त्यांचा वीसगाव खोरे परिसरात नावलौकिक होता. गोपाळ मस्के यांनी भिवंडी( मुंबई )येथे अनेक वर्ष सूतगिरणी मध्ये काम करून नवनवीन कामगारांना घडविण्याचे उत्तमरीत्या काम केले होते. म्हस्के यांच्या जाण्याने नेरे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS