भोर ! महुडे खुर्द येथे नीरा डाव्या कालव्याचे होणार खा. सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन : जि. प. मा. उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांची माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
महूडे खुर्द ता.भोर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निरा डावा कालव्याचा प्रश्न मार्गी लागला असून निरा डावा कालव्याचे महूडे खुर्द येथे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
      तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम -डोंगरी महूडे  खुर्द पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्याची फार मोठी समस्या असल्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निरा डावा कालव्यासाठी २८.४७ कोटी निधी मंजूर झालेला आहे.या नीरा डाव्या कालव्याचे भूमिपूजन उद्या मंगळवार दि.१८ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे.तर रायरेश्वर किल्ल्यावर रायरेश्वर महादेवाचा महाअभिषेक, कोर्ले येथील मंजूर लघुपाटबंधारे तलाव २३.१० कोटी जागेची पाहणी व शेतकऱ्यांची चर्चा तसेच भोलावडे व किवत ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार व भव्य शेतकरी मेळावा होणार असल्याचेही शिवतरे यांनी सांगितले.
To Top