सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतरराव पिसाळ
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाई शहरासह ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आणी ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की, सध्या दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. पोलिसांच्या अनुभवा वरून या काळामध्ये दागिने व पैसे मोठ्या प्रमाणा मध्ये आपल्या घरात, फ्लॅटमध्ये पूजा करण्या साठी आणून ठेवलेले असतात .
आपण कामा निमित्त घराला कुलूप लावून कामावर जातो किंवा बाहेर कामा निमित्त जातो किंवा बाहेर गावी जातो. अशा वेळेस आपल्या घराचे, फ्लॅटचे चोर कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट असेल किंवा लाकडी कपाट असेल त्यामध्ये तुमची अलमारी असते त्या मध्ये ठेवलेले दागिने व पैसे चोर चोरी करून घेऊन पळून जातात. आपल्याला त्यामुळे नुकसान होते. अशा वेळेस नागरिकांनी सावधान राहिले पाहिजे .स्वतःच्या पैशाची व दागिन्याचे स्वसंरक्षण केले पाहिजे. स्वसंरक्षण म्हणजे काय पैसे व दागिने घरामध्ये कपाटा मध्ये ठेवू नयेत मग कोठे ठेवावेत तर घरा मध्ये ज्या ठिकाणी अडगळीची जागा आहे चोरांना सापडणार नाही अशा ठिकाणी दागिने व पैसे ठेवावेत. म्हणजे आपल्याला नुकसान होणार नाही किंवा बँकेमध्ये लॉकर मध्ये ठेवावेत. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून घ्यावेत वॉचमन ठेवावा.तसेच सोसायटीतील सर्व लोकांनी एकत्रित मिळून सीसीटीव्ही व वाचमेन ठेवण्याची व्यवस्था करावी. पोलिसांनी दिवस-रात्र पेट्रोलिंग ठेवलेली आहे दिवाळी सणा निमित्त प्रत्येक गल्लीमध्ये ,एरियामध्ये पोलीस साध्या वेषात व युनिफॉर्म मध्ये पेट्रोलिंग करणार आहेत परंतु आपणही आपल्या दागिने व पैशांची काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की घरामध्ये कपाटा मध्ये पैसे ठेवू नयेत. आपणास पोलिसांची मदत लागल्यास तात्काळ आपण डायल 112 ला कॉल करावा. म्हणजे त्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटात पोलिस आपल्या मदतीला येतील. असेही आवाहन वाई ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे .