सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील वाई पाचवड रोडवर असणाऱ्या कडेगावात गोसावी वस्तीवर विना परवाना चोरुन दारुची विक्री होत असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुमडे यांना खबऱ्या मार्फत मिळताच त्यांनी डिबी पथकाचे हवलदार विजय शिर्के प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड महिला पोलिस कॉस्टेबल सोनाली माने यांना बोलावून घेऊन कडेगाव येथे छापा टाकण्याचे आदेश दिले होते .
ऐन दिवाळीत अचानकपणे पडलेल्या या पोलिसांच्या छाप्या मुळे चोरटी दारु विक्रत्यान मध्ये खळबळ ऊडाली आहे .नेमलेल्या वरील पोलिस पथकाने वाई पाचवड
या रस्त्यावर असणार्या कडेगाव येथील गोसावी वस्तीवर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सापळा लावुन टेहळणी केली असता त्याच गोसावी वस्ती राहणार सुरज संतोष पवार वय २४ हा तरुण त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला एक लाल रंगाची पिशवी हातात घेऊन दारुच्या बाटल्यांची विना परवाना चोरटी विक्री करत असताना या पोलिस पथकाला दिसुन आला त्या ठिकाणी पथकाने धाडसी छापा टाकुन संतोष पवारला पिशवीसह ताब्यात घेऊन त्याच्या पिशवीची तपासणी केली असता त्या मध्ये ९० मीलीच्या १ हजार ८५५ रुपयांच्या ५३ देशी दारूच्या बाटल्या सापडल्या त्या पथकाने जागेवरच पंचनामा करून विक्रता संतोष पवार याला ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यास सपोनि रविंद्र तेलतुमडे यांच्या समोर ऊभे केले असता त्यांनी त्याच्या विरुद्ध पोलिस पथकातील श्रावण राठोड यांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले हि तक्रार दाखल होताच संतोष पवार यांच्या वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . डिबीच्या या धाडसी कारवाई मुळे चोरुन दारु विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. कडेगाव ग्रामस्थांनी वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे सपोनि रविंद्र तेलतुमडे यांच्या सह डिबी पथकाचे कौतुक केले आहे .