बारामती ! 'सोमेश्वर'च्या 'या' संचालकाकडून दिवाळीनिमित्त २५० कुटुंबियांना साखर वाटप

Admin
2 minute read
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील २५० कुटुंबाला दिवाळीनिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड यांच्यातर्फे साखर वाटप करण्यात आले. 
            संचालक ऋषी गायकवाड यांच्यातर्फे २५० कुटुंबांना साखर देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. साखरेचे वाटप करंजेपूल, गायकवाड वस्ती आणि शेंडकरवाडी या ठिकाणी करण्यात आले. साखर वाटपाचे नियोजन निलेश गायकवाड, सागर गायकवाड, सुहास गायकवाड, धीरज गायकवाड, हरीश गायकवाड, मंगेश गायकवाड, विनोद गायकवाड, संजय गायकवाड, प्रवीण गायकवाड, मयूर गायकवाड,निखिल गायकवाड, अरुण निकम, महेश पवार, सौरभ पवार, सागर फाटे, अजिंक्य चौधरी, गणेश वाघमारे आणि ऋषीआबा गायकवाड मित्रपरिवार यांच्यातर्फे करण्यात आले.
To Top