सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील नीरा देवघर धरण पट्ट्यातील हिर्डोशी ता.भोर परिसरात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिर्डोशी परिसर दुर्गम - डोंगरी जंगलमय असून रात्रीच्यावेळी येथील गावांच्या शेजारी जंगली हिंस्र प्राणी व बिबट्याचा वावर होत असतो.मागील आठ दिवसांपूर्वी वेणुपुरी,कोंढरी येथील गावांमधील दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तर जनावरांना माळरानावर चारण्यासाठी घेऊन जाणारे शेतकरी भीतीमुळे घाबरून गेले आहेत.वनविभागाने नागरिकांना रात्रीचे वेळी बाहेर पडू नये तसेच जनावरांना बंदिस्त घोट्यात भांदून ठेवावे तर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.