भोर ! सोन्याच्या दुकानात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील सोन्याच्या दुकानात ग्राहकांनी दोन वर्षानंतर सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली असल्याने दुकानांना झळाळी आल्याचे चित्र आहे.
      मागील दोन वर्ष कोरोना काळात गेल्याने ग्राहकांकडून सोने खरेदी ठप्प झाली होती.मात्र सध्या दोन वर्षांनंतर सोने खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडले असून सोन्याच्या दालनामध्ये गर्दी करीत आहेत.सद्या सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाल्याने खरेदी गर्दी केल्याचे ग्राहकांकडून सांगितले गेले. भोर शहरातील सोने दालनात ग्राहकांना शुद्ध सोने व उत्तम सेवा दिली जात असल्याने असे श्री गणेश ज्वेलर्स चौपाटीचे मालक सुरेश परमार यांनी सांगितले.
To Top