सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वढाणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित वढाणे या संस्थेची नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया नुकतीच बारामती येथील सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडली यामध्ये नितीन प्रकाश चौधरी यांची अध्यक्षपदी तर बाबा डोंगरु शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संस्थेचे विद्यमानअध्यक्ष रामदास राऊ लकडे व उपाध्यक्ष रुक्मिणी विठ्ठल चौधरी यांनी राजीनामा दिल्याने ही प्रक्रिया होऊन यामध्ये निवड झाली. या निवडीसाठी सर्व संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अमर गायकवाड यांनी कामकाज पाहिले.त्यांना संस्थेचे सचिव राजाराम भोंडवे व सहसचिव विठ्ठल गोसावी यांनी सहकार्य केले.
*********************