सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोरमध्ये आदिवासी,कातकरी,मजूर ४०० कुटुंबीयांना आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.८ मधील माजी उपनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक सुमंत शेटे,बजरंग शिंदे,शांताराम पवार यांच्यावतीने दिवाळी फराळ व मिठाई वाटप करण्यात आली.
अनेक वर्षांपासून हा उपक्रम आदिवशी ,कातकरी,मजूर कुटुंबीय आपल्यातीलच एक बांधव समजून दिवाळी सण यांच्या सोबत साजरा केला जातो.यावेळी अनंतनगर वसाहत ,संजय नगर वसाहत, वैशाली थेएटर समोरील झोपडपट्टी तसेच धनगर वस्तीतील नागरिकांना दिवाळी फराळ व मिठाई देण्यात आली.याप्रसंगी पृथीवराजभैया थोपटे,गणेश मोहिते,सरपंच प्रमोद थोपटे,बाळाभाऊ शेटे,सुनील थोपटे,महेंद्र साळुंखे,अनिकेत माने,अनिकेत मेढेकर,बालाजी शेटे,विकास बोडके,संजय खामकर उपस्थित होते.
COMMENTS