बारामती ! भावाच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसून बहिणीनेही सोडले प्राण : मुर्टी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव  :- प्रतिनिधी  
भावाच्या निधनाने बहीणीला मानसिक धक्का बसून बहीणीचीही प्राणज्योत विझली   असल्याची घटना नुकतीच  मुर्टी ता. बारामती येथे घडली . बाळासाहेब बबन शेलार यांच्या मृत्यू नंतर पंधरा दिवसांनी त्यांची बहीण  शशीकला दत्तात्रेय तावरे यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .
        समाजात आपण अनेक उदाहरणे भावाच्या विरोधात बहीणीने जमिन अथवा स्थावर मालमत्तेसाठी  दावा केले आहे . पण काही बहीणी आजही आपल्या भावावर जिवापाड प्रेम करणारी  उदाहरण बोटावर मोजण्या इतकीच सापडतात .अशीच दुख:त घटना  मुर्टी येथे नुकतीच घडली.  मुर्टी येथील बाळासाहेब बबन शेलार यांचे दि.८ ऑक्टोबर रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले. याचाच धक्का  बसून त्यांची थोरली बहीण  शशिकला दत्तात्रेय तावरे   यांचे  निधन झाले . भावाच्या  म्रुत्युनंतर अवघ्या पंधराच दिवसात मानसिक धक्याने  निधन झाल्या मुळे चिरेखानवाडी व मुर्टी पंचक्रोशीतुन हळहळ व्यक्त होत आहे. 

 शशिकला दत्तात्रेय तावरे या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरेखानवाडी मध्ये मध्यान्ह भोजन बनवत होत्या. शशिकला दत्तात्रेय तावरे यांच्या मागे पती दत्तात्रेय तावरे ,मुलगा संतोष तावरे ,मुलगी श्रीलता दत्तात्रेय तावरे ,दीर,  त्यांच्या जावा असा मोठा परीवार आहे . प्रगती हायस्कूल चे आदर्श व माजी मुख्याध्यापक ईश्वर एकनाथ तावरे यांच्या त्या वहीणी होत .
To Top