सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव- बारामती रस्त्यावरील कऱ्हाटी नजिक फोंढवाडा येथे भीषण आपघात झाला असून एक चारचाकी, एक स्कुटी आणि एक पदचारी यामध्ये हा अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये चारचाकी गाडी व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण व रस्त्याच्या बाजूने चालत चाललेला पादचारी याचा मूत्यू झाला आहे. नंदा गंगाराम राऊत वय ४८
अतुल गंगाराम राऊत वय २७ व दशरथ साहेबराव पिसाळ वय ६२ या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी दिली.