वाई ! रेशनिंग दुकानाला जोडधंदा म्हणून हा पठठया दारू विकायचा : बालेघरच्या रेशनींग दुकानदाराच्या वाई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी  
बालेघर ता.वाई येथील रेशनींग दुकानदार सूर्यकांत साहेबराव सुर्यवंशी याच्या वर वाईच्या डीबी पथकाने चित्यथरारक तब्बल २० किलोमीटर पाठलाग करुन मांढरदेव येथे  धाड टाकून त्याच्या कडून तब्बल ५५ हजार रुपये किमतीच्या १०० दारुच्या बाटल्या आणी दुचाकी जप्त केल्याने व त्याच्या वर गुन्हा दाखल झाल्याने वाई तहसील कार्यालयातील पुरवठा विभागासह वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे .
       रेशनींग दुकानाला जोड धंदा म्हणून हा दुकानदार दारु विक्रीचा व्यवसाय करत होता असे बालेघर येथील नागरिकांनी सांगितले आहे. वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबर्या मार्फत माहिती मिळाली कि वाईच्या किसनवीर चौकातुन रविवार पेठ मार्गे मांढरदेवच्या दिशेने  स्लेन्डर दुचाकी क्र.एम.एच.११ बी.पी.९८७५ वरुन एक अनोळखी माणूस पांढर्या रंगाच्या पोत्यात देशी दारुची चोरटी वाहतुक करीत आहे .
        अशी माहिती प्राप्त होताच बाळासाहेब भरणे यांनी तात्काळ डिबी पथकाचे प्रमुख असलेले विजय शिर्के महिला हवलदार प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड अमीत गोळे किरण निंबाळकर यांना बोलावून या दुचाकीचा पाठलाग करुन आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश देऊन दारुचे 
 बॉक्स जप्त करण्याचे आदेश दिले होते .
या आदेशाचे पालन करत वरील डिबी पथकाच्या पोलिस कर्मचार्यांनी या दुचाकीचा चित्यथरारक तब्बल २० किलोमीटर घाट रस्त्यावर पाठलाग करुन अखेर मांढरदेव ग्रामपंचायतीच्या टोल नाक्या समोर भर दिवसा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेगात असणारी दुचाकी थांबविण्यास पथकाला यश आले .दुचाकी वर पांढर्या रंगाचे असणार्या पोत्याची तपासणी केली असता त्या मध्ये तब्बल १००देशी  दारुच्या बाटल्या मिळुन आल्या .आरोपीला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सूर्यकांत  साहेबराव सुर्यवंशी वय ४५ राहणार बालेघर ता.वाई व्यवसाय रेशनींग दुकानदार असे सांगितले.
           पथकाने दारुच्या १०० बाटल्यांन सह आरोपी ताब्यात घेऊन त्यास वाई पोलिस ठाण्यात आणुन त्याच्या विरुद्ध पथकातील पोलिस कॉस्टेबल प्रसाद दुदुस्कर यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून   रितसर गुन्हा दाखल केला आहे .हा रेशनींग दुकानदार जोडधंदा म्हणून गेली अनेक दिवसा पासून बालेघर येथे देशी दारु विक्रीचा व्यवसाय करत असलेच्या तक्रारी वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना प्राप्त झाल्या पासून डिबी पथकाने कायम त्याच्या वर पाळत ठेवून त्याला अखेर गजाआड करण्यात यश मिळविले या रेशनींग दुकानदारावर झालेल्या या कारवाई मुळे वाई तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेसह वाई तालुक्यात खळबळ ऊडाली आहे ..
To Top