सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर विधानसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील सुस, माळुंगे व बावधन या नव्याने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विविध विकास कामांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा असे निवेदन भोर -वेल्हा -मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मनपाचे मुख्य आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.
मनपा आयुक्त यांना निवेदन देताच समाविष्ट गावांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे अश्वासन दिल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.याप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पोपटराव सुके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती धनंजय वाडकर, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, सुसचे मा.उपसरपंच सचिन चांदेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते उपस्थित होते.