बारामती ! कुणी कशीही माणसं फोडतंय...! लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झालाय....! ना. अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दोघे एकमेकांना गद्दार बोलतात...त्याने प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख लोकांचे गेलेले रोजगार, देशातील महागाई यावर बोलायला कोणी तयार नाही. कोणी कोणाची माणसे फोडतंय. लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. 
        बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी आमदार संजय जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिन सातव, नीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.  
              पवार पुढे म्हणाले, सद्याच्या सुरू असलेल्या राज्यातील गोंधळामुळे कुठलं सरकार किती दिवस टिकेल हे अधिकाऱ्यांच समजेना. त्यामुळे त्यांची तारेवरची कसरत सुरू असून याचा राज्याच्या विकासावर परिणाम होत आहे. नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले, काही लोक याबाबत दिशाभूल करत असून नौटंकी करण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी आपल्या कालव्याचे पाणी दुसरीकडे गेले त्यावेळी हे कुठे गेले होते. त्यावेळी ते गप्प का बसले. ज्या ठिकाणी कालव्याला वळणे आहेत अशा ठिकाणी आपण प्लास्टिक कागद न टाकता अस्तरीकरण करणार आहे. काही लोक याबाबत देखील चुकीची माहिती पसरवत आहेत. सद्याच्या शिंदे सरकारवर टीका करताना ते म्हणाले, दसऱ्याच्या दिवशी तर काय बिकेसी मैदान..शिवतीर्थ मैदान.. त्यांनी पांढरा ड्रेस घातला आहे. ते उतरले. ते आता पायऱ्या चढत आहेत. काहीही पाहायला मिळत असल्याची खिल्ली उडवत हा गद्दार तो गद्दार म्हणून राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का असा सवालही केला. साखर निर्यातीबाबत बोलताना पवार यांनी केंद्र सरकारने गेल्या वर्षी राबबलेले निर्यातीचे धोरण राबवावे तसेच सद्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७२ टक्के २६५ ऊस असून ८६०३२ ऊसाचे क्षेत्र वाढवले तर साखर उतारा जादा मिळून टनाला १५० रुपये जादा मिळतील असे पवार म्हणाले. 
To Top