काय करणार ....चेअरमनचं ऐकावं लागतं....! नाहीतर ते मला डायरेक्टर करणार नाहीत...! अजित पवार

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांची उद्घाटने झाली. यामध्ये सोमेश्वर वाचनालयाचे देखील उदघाटन पार पडले. 
           दारम्यान सोमेश्वर वाचनालयाला पुणे जिल्हा बँकेच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, 
सद्या वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. पण वाचाल तर वाचाल असे सांगत. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे यांनी सोमेश्वर वाचनालयाला ५० हजार रुपयांची देणगी दिली. यावर अजित पवार म्हणाले, काय करणार चेअरमनचं  ऐकावं लागतं.. नाहीतर ते मला डायरेक्टर करणार नाहीत. असे म्हणटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी तात्काळ अजित पवार यांनी जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर व दत्तात्रय येळे यांना  संबंधीताना हा धनादेश पोहोचवण्याच्या सूचनाही केल्या. 
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी आमदार संजय जगताप, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिन सातव, नीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top