सोमेश्व रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर कारखाना येथे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते विविध उद्घाटने पार पडली. यावेळी सोमेश्वर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ, सायन्स महाविद्यालयात इमारत, मुलींचे वसतिगृह इमारत, कामगार वसाहत इमारत अशी विविध उद्घाटने पार पडली.
यावेळी अजितदादा म्हणतात एका शेयर्स ला पाच किलो साखर मिळते व दिवाळीची दहा किलो म्हणजे वर्षाला सभासदांना ७० किलो साखर मिळते. तेवढ्यात खाली बसलेल्या सभासदांमधून एक दोन आवाज येतात. दादा ७० नाही ९० किलो मिळते. अजित दादांना आवाज ऐकायला व्यवस्थित गेला नसल्याने दादा पुन्हा विचारतात..त्यावर खालून आवाज येतो. दिवाळीची १० किलो नाही ३० किलो साखर मिळते अशी मिळून वर्षाला ९० किलो मिळते.यावर अजितदादा म्हणतात...कदाचित मला चुकीची माहिती मिळाली असेल....आपली माघार बाबा...जास्त तानायचं नाही म्हणत दादा सभासदांना हात जोडतात. आणि सभागृहात एकच हशा पिकतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी आमदार संजय जगताप, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, सचिन सातव, नीता फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.