सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बालाजी मशरूम या कंपनीचे उदघाटन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कंपनीचे शेड उभारणाऱ्या श्रीनिक इन्फा चे डायरेक्ट श्रीराज जगताप यांचे अजितदादांनी कौतुकाची थाप टाकली.
वाघळवाडी ता बारामती येथे तिरुपती बालाजी मशरूम कंपनीच्या १० टन प्रकल्पाचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, पुरुषोत्तम जगताप, आर एन शिंदे, प्रमोद काकडे, शहाजी काकडे, संजय शिंदे, डॉ दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.