सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना दिवाळीपूर्वी प्रतिटन १०३ रुपये, ठेवींवरील व्याज तसेच कामगारांना बोनस तसेच पगार वाढीतील दीड कोटींचा पहिला हप्ता देणार असल्याचे सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय जगताप, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, सुदाम इंगळे, छत्रपती चे अध्यक्ष प्रशांत काटे, राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर,
पुढे ते म्हणाले, गेल्या हंगामात सोमेश्वरने १३ लाख टन ऊसाचे गाळप केले असून त्याला ३ हजार २० रुपये दर दिला असून एफआरपी चे २८६७ पूर्वीच वर्ग केले असून ३०२० पैकी ५० रुपये भागविकास निधी वजा जाता उर्वरित प्रतिटन १०३ रुपये तसेच ठेवींवरील व्याज,आणि कामगार बोनससह कामगारांच्या पगार वाढीतील फरक दीड कोटींचा पहिला हप्ता वर्ग करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.