सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कांबळे वस्ती (कोऱ्हाळे बुद्रुक) येथील व्यावसायिक नंदकुमार लक्ष्मण कांबळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५० वर्षाचे होते.
कोऱ्हाळे बुद्रुक गावात त्यांचे भैरवनाथ टी स्टॉल नावाचे हॉटेल होते. त्यांचा धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे गावातील सर्व जाती धर्मातील व्यक्तींचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. गेली तीन वर्षे ते कर्क रोगाशी झगडत होते. त्यांच्या मागे विवाहित मुली,मुलगा, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.