सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोरमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी भक्तीरंग पहाटेत कोरोणाच्या दोन वर्षांच्या काळानंतर हजारो नागरिकांनी सहभागी होत सुरेल मैफिलीचा आनंद लुटला.तर कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल संगीताने नागरिक भारावून गेले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुणे शहराप्रमाणे ग्रामीण भागातही दिवाळीचा उत्साह नागरिकांमध्ये द्विगुणित होऊन पहायला मिळत आहे.दिवाळीनिमित्त भोर शहरामध्ये सखल मराठा समाजातर्फे दिवाळी भक्तीरंग पहाटेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल संगीताने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध होऊन भक्तीरसात नाहून गेले होते. विशेष म्हणजे या भक्तीरंग मैफलित महाराष्ट्राची लोकधारा दर्शवणारी गाणी सादर करण्यात आली.यावेळी हजारो नागरिकांसह भोर तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.