बारामती ! ऐन दिवाळीत फटाके विकण्याऐवजी हा 'वाचनवेडा' विकतोय पुस्तके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील राजू बदडे या वाचनवेड्या अवलियाने फटाके विकण्याऐवजी पुस्तकांचे दुकान लावले आहे. आणि विशेष म्हणजे त्याला चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. 
            राजू बडदे हे सोमेश्वरनगर हे चहाचे हॉटेल चालवतात. व्यवसाय सुरळीत सुरू झाल्यावर तो मागील पाच ते सहा वर्षापासून वाचनाच करत आहे. आजपर्यंत त्यांनी असंख्य पुस्तकांचे वाचन केले आहे. बडदे यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तकांमध्ये र. धो. कर्वे यांचे एकटा, मेहरुनीसा दलवाई यांचे मी भरून पावले आहे, नरेंद्र दाभोळकर यांचे श्रद्धा- अंधश्रद्धा, विश्वस पाटिल यांचे  झुंडीचे मानसशास्त्र, डॉ हमीद दाभोलकर यांचे विवेकाच्या वाटेवर, पेरियार यांचे सच्ची रामायण, सुरेश द्वादशीवार यांचे युगांतर तसेच शिवाजी कोण होता, सावित्रीबाई फुले, एक होता कार्व्हर,कल्पना चावला यांची वैचारिक, कथा, कादंबरी, पुरोगामी, विज्ञानवादी अशी ७३ प्रकारची पुस्तके विक्रीसाठी  उपलब्ध आहेत. भारत ज्ञान विज्ञात समुदाय आणि अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. 
       सद्याच्या सोशल मीडियाच्या युगात तरुणपिढी वाचनापासून दूर निघाली आहे. आयुष्याचा खरा ठेवा पुस्तकातुनच मिळतो. त्यासाठी समाजातील तरुण पिढीने वाचनाकडे वळावे हे उद्दिष्ट ठेऊन हा पुस्तकांचे दुकान लावण्यात आले आहे. 
        दिवाळीत फटाक्यांसाठी हजारो खर्च केला जातो. पण आपण १०० रुवयांचे पुस्तक विकत घेत नाही. त्यासाठी या पुस्तकांवर १० टक्के सवलत देण्यात आली आहे. 
------------------
राजू बडदे-
वैचारीक स्थैर्य जर प्राप्त करायचे असेल तर वाचनशिवाय पर्याय नाही. जगात अनेक प्रगत देशात डिजिटल मीडिया कितीही पुढे गेला असला तरीही तुम्हाला पुस्तकाशिवाय ज्ञान मिळू शकत नाही.
To Top