भोर ! ध्रुव प्रतिष्ठानकडून वंचिताची दिवाळी गोड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील ध्रुवप्रतिष्ठांच्या वतीने  आदिवासी व गरीब कुटुंबाला दिवाळी फराळ साहित्य, तेल ,उटणे व मोती साबण, आकाश कंदील याचे वाटप करून वंचितांची दिवाळी गोड केली. ध्रुव प्रतिष्ठानने वंचितांना दिवाळी फराळ तसेच साहित्य वाटप केल्याने वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते            
    प्रतिष्ठान मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम राबवीत असून टिटेघर,आंबवडे,नाटंबी, म्हकोशी, आंबेघर, शिरवली, भोर येथील झोपडपट्टीत राहणारे अतिगरीब तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या गरीब व वेडसर लोकांना दीपावली फराळ वाटप करण्यात आला.आत्तापर्यंत १३० कुटुंबामध्ये या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.प्रतिष्ठान अनेक वर्षापासून या कुटुंबाशी संलग्न असून कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच इतर मदतही करत असते.दिवाळी साहित्य वाटप करतेवेळी ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर, योगीराज केळकर, राहुल खोपडे, अविनाश चिकणे, अमीर पवार उपस्थित होते
To Top