सोमेश्वर रिपोर्टर टिम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून सोमेश्वरनगर परीसरात पावसाने ऊसतोडणी कामगारांचे मोठे हाल झाले. ऊसतोडणी कामगारांना मदत व त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सोमेश्वरचे कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी आपल्या सहकारी पत्रकार परीसरातील दानशूर व्यक्तींच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांना मदतीचे आवाहन केले होते. याला परीसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत प्रचंड प्रमाणात मदत गोळा झाली.
पत्रकार दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर ॲड.गणेश आळंदीकर, महेश जगताप, युवराज खोमणे, ॲड नवनाथ भोसले ,उद्योजक दीपक साखरे, नितीन यादव
दीपक भोसले, प्रा. रोहित बोत्रे, यांनी विविध व्हाटस अपगृपवर या कामगारांना मदतीसाठी व दिवाळी गोड करण्यासाठी आवाहन केले होते. तीनच दिवसांत शेकडो नव्या - तसेच उत्तम पद्धतीच्या साड्या, न वापरलेले अथवा मापात कमी जास्त झालेले शेकडो ड्रेस ,अगदी परिट घडी असलेले कपडे, साड्या, लहान मुलांचे ड्रेस, सर्व प्रकारचा दिवाळी फराळ, शालेय साहित्य, साखर आदी साहित्य जमा झाले. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर , संचालक लक्ष्मण गोफणे ,शैलेश रासकर ,सुनील भगत, प्रवीण कांबळे, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवार(दि.२४) रोजी ऊसतोडणी कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर कारखान्यानेही कामगारांना मदत केली. उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी सांगीतले की ,३१ ऑक्टोबर पर्यंत तोडल्या जाणाऱ्या ऊसाला ऊसतोडणी कामगाराला वेगळा ५० रुपये प्रतिटन दर मिळणार आहे. होळकर यांनी १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले आहे उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच हे साहित्य देणार असल्याचे सांगितले. सोमेश्वरची साखर शाळा राज्यातील आदर्श ठरणार असल्याचे ते म्हणाले. सोमेश्वरच्या पत्रकार ,सादसंवाद गृप ,गड किल्ले गृप ,एक हात मदतीचा गृप सर्वांचे कौतुक त्यांनी केले. एकुणच शेतकऱ्यांची मदत व कारखान्याची मदत यामुळे ऊसतोडणी कामगारांचा उत्साह नक्की वाढेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात दत्ता माळशिकारे यांनी उपक्रमाबद्दल माहीती दिली. ॲड गणेश आळंदीकर यांनी पंचक्रोशीतील दानशुरांचे आभार मानुन पत्रकारांच्या व गृपच्या विविध उपक्रमाबद्दल माहीती दिली. संतोष शेंडकर यांनी राज्यात कारखान्याद्वारे साखर शाळा चालवला जाणारा हा एकमेव कारखाना असुन ऊसतोडणी कामगाराच्या प्रत्येक अडचणीला शेतकरी धावुन येत आहे त्यामुळे या शेतकरी वर्गांची देखील ऊसतोडणी करताना अडवणुक होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती बांधवाना केली.