वाई ! डिबी पथकाची दमदार कारवाई : शिवाजी चौकात सव्वा लाखांची देशी विदेशी दारु केली जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ 
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबऱ्या मार्फत माहिती मिळाली कि वाईच्या शिवाजी चौकातुन अॅक्सेस मोटर सायकल क्र.एम.एच.११ डी .इ .९०८७ या  वरुन सव्वा लाख रुपये किमतीचे देशी विदेशी दारुचे चार बॉक्स पोत्यात भरुन वाहतुक होणार असल्याची माहिती प्राप्त होताच त्यांनी डिबी पथकाचे प्रमुख असलेले हवलदार विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने प्रसाद दुदुस्कर श्रावण राठोड अमीत गोळे यांना बोलावून घेऊन भोगाव  ता.वाई येथील रहिवासी असलेला विजय संदीप जाधवे वय २९ धंदा वॉशिंग सेंटर हा तरुण विना परवाना एका पांढर्या रंगाच्या आणी एका खाकी  रंगाच्या अशा  दोन  पोत्यांन मधुन देशी आणी विदेशी दारुच्या बाटल्यांनी भरलेले दोन बॉक्स घेऊन जाणार आहे त्याला पकडण्या साठी शिवाजी चौकात सापळा लावण्याचे आदेश दिल्याने वरील डिबी पथक तातडीने नेमून दिलेल्या कामगीरी वर रवाना झाले .
            पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या पाठबळमुळे डिबीच्या पाठीशी असल्यामुळे आणी तडजोड किंवा लाच खाणे हा खेळ ते खेळत नसल्याने  सापळा लावणे आणी जिवावर उदार होऊन  आरोपी पकडणे हा वाईच्या डिबी पथकाचा आवडता छंद असल्यानेच प्रत्येक महिन्याला जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन वाईच्या डिबी पथकातील पोलिसांचा गुण गौरव केला जातो .बाळासाहेब भरणे हजर झाल्या पासून डिबी पथकाने वाई शहर  व ग्रामीण हद्दीत घडत असलेले गुन्हे तात्काळ  ऊघडकीस आणले आहेत .त्या मुळे वाईची डिबी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाच्या उंबरठ्यावर  ऊभी आहे .
        वाईच्या डिबीने खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाईच्या शिवाजी चौकात सापळा लावला असता रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास  वरील क्रमांकाची दुचाकी भरघाव वेगात आली असता 
पोलिस पथकाने त्या वर झडप घालून त्या वरील विजय संदीप जानवे वय २९ राहणार भोगाव ता.वाई (सातारा ) याच्या ताब्यात असणारी दोन वेग वेगळ्या रंगाची भरलेली पोती होती त्याची पथकातील पोलिसांनी पाहणी केली असता एका खाकी रंगाच्या  पोत्यात असणार्या बॉक्स मध्ये देशी दारूच्या १८० मीलीच्या सिलबंद १० हजार ८० रुपये किमतीच्या १४४ बाटल्या मिळुन आल्या .तर दुसर्या पांढर्या रंगाच्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये १८० मीलीच्या मॅगडॉल नं.१ या कंपनीच्या विदेशी दारुने भरलेल्या १४ हजार ९०० रुपये किमतीच्या  ९६ बाटल्या मिळुन आल्या आणी १ लाख रुपये किमतीची दुचाकी असा मिळुन ऐकुन सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करुन आरोपी ताब्यात घेऊन ऐन दिवाळीत  डिबी पथकान नेमुन दिलेली कामगीरी यशस्वी केली .
        याची तक्रार पथकातील पोलिस कॉस्टेबल अमीत बळवंत गोळे वय ३६ यांनी आरोपी विजय संदीप जानवे राहणार भोगाव ता. वाई याच्या विरोधात वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे .
To Top