आज जागतिक पक्षाघात दिन ! डॉ. विद्यानंद भिलारे ! वृद्ध व तरूणांमध्ये वाढते पक्षाघाताचे प्रमाण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : विशेष प्रतिनिधी
"BE FAST" "जलद उपचार जलद सुधारणा"लक्षणे -
तोल जाणे 
डोळ्यांमधील बदल 
चेहऱ्यामधील वक्रता वेडावाकडा चेहरा होणे 
हातापायांचा अशक्तपणा ताकद कमी होणे 
बोलण्यामध्ये जीभ जड येणे
हाता पायाला मुंग्या येणे 
चक्कर येणे 
तीव्र डोकेदुखी, इत्यादी पक्षाघाताची लक्षणे असू शकतात यामधील कोणतीही लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या हॉस्पिटलची संपर्क साधून आपण शुगर बीपी व लक्षण असल्यास त्वरित स्कॅन करून लवकर उपचार सुरू केल्यास जल सुधारणा होऊ शकते 
पक्षाघाताची मुळात दोन प्रकार आहेत 
१) Haemorrhagic Stroke (मेंदूमधील झालेल्या रक्तस्रावामुळे -अचानक रक्तदाब वाढणे किंवा मेंदूमधील रक्तामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कॉइल असणे तसेच डोक्याला मार लागणे इत्यादी कारणांमुळे)  
२) Ischemic Stroke (मेंदूला रक्तपुरवठा कमी मिळाल्यामुळे किंवा मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाल्याने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. शुगर, ब्लड प्रेशर, रक्तामधील चरबी वाढणे व रक्ता मधील गाठी , ब्लडप्रेशर कमी जास्त होणे, हृदयातील झडपांचे घर्षण इत्यादी कारणांनी मेंदूतील रक्तवाहिन्या संकुचित होऊन किंवा अडथळा येऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी मिळाल्याने मेंदूतील पेशी निष्क्रिय होऊ लागतात व पक्षाघाताची लक्षणे दिसतात)

प्रतिबंधात्मक उपाययोजना -रेगुलर वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणे व तपासण्या करणे तसेच शुगर किंवा ब्लड प्रेशर असे आजार आहेत त्यांनी वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे व योग्य नियंत्रण ठेवणे. 

उपचार पद्धतीमध्ये - पक्षाघाताची लक्षणे आढळल्यानंतर त्वरित जवळील तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे व लवकरात लवकर स्कॅन करून कोणत्या प्रकारचा पक्षघात आहे याचे निदान करणे गरजेचे असू शकते त्यातून उपचाराची पूर्वकल्पना आल्यामुळे जलद उपचार सुरू झालेले झाल्याने रुग्णांमध्ये जल सुधारणा दिसू शकते. आजकाल रक्ताच्या गाठी विरघळण्यासाठी उच्च प्रतीचे औषध रुग्ण गोल्डन आवर मध्ये आल्यास दिल्याने रुग्णांमध्ये त्वरित सुधारणा होताना दिसते तसेच ज्या रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता आहे त्याचा निर्णय लवकर झाल्याने त्याचे प्राण वाचू शकते.
-------------------------
डॉ. विद्यानंद भिलारे MD
साई सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु सोमेश्वरनगर
To Top