सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी हीर्डोस मावळ खोऱ्यातील धानवली ता.भोर येथील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अथर्व लक्ष्मण धानवले वय १६ रा.धानवली येथील अल्पवयीन मुलाने गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्हरांड्यातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.२३ पहाटेच्यावेळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि. २३ अल्पवयीन मुलगा पहाटेच्या वेळी घरात नसल्याने मुलाच्या आईने व शेजारील नागरिकांनी मुलाची शोधा शोध सुरू केली असता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानवली ता.भोर येथील शाळेच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला उपजिल्हा रुग्णालय भोर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. पुढील भोर पोलीस करीत आहेत.