बारामती ! सोमेश्वरनगर येथील सुवर्णा निंबाळकर हिचे यश : राज्यकर निरीक्षकपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सुवर्णा राजेंद्र निंबाळकर हिची जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेत यश संपादन करत राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. 
            राज्यसरकारने २०२१ मध्ये राज्यकर निरीक्षकाच्या ६०० जागांसाठी जाहिराती काढली होती. जुलै २०२२ ला जागांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये सुवर्णा हिने यश संपादन केले.
To Top