सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (Government ITI) शिक्षकाने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोणंद येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ईलेक्ट्रीशियन विषयाचा कंत्राटी शिक्षक विकास तानाजी बोडरे वय ३२ मूळ रा विठ्ठलापूर ता आटपाडी जि सांगली हल्ली रा बाजारतळ लोणंद याने त्याच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकण्यास असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांला दिनांक २४ मार्च २०२२ रोजी काम आहे असे सांगत स्वतःच्या रूमवर बोलावून घेत त्याच्या गरीबीचा आणि असहाय्यतेचा फायदा घेत तसेच अनुपस्थिती दाखवून काॅलेजमधून काढून टाकण्याची तसेच नापास करण्याची धमकी देत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. तसेच मागील नऊ महिन्यांत सदर विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
सदर प्रकार असह्य झाल्यावर पिडीत मुलाने आयटीआय मधील सुपरवायझर शिक्षकेस सदर प्रकार सांगितल्यानंतर शिक्षिकेने पिडीत मुलास चाईल्ड हेल्पलाईन ( Child helpline 1098) वर फोन करून माहिती देण्यास सांगितले तसेच पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी सोबत येत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी आयटीआय शिक्षक विकास बोडरे याच्यावर लोणंद पोलीसात पोक्सोअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला असुन लोणंद पोलीसांनी या शिक्षकास ताताकाळ अटक केली आहे. या घटनेमुळे लोणंद परिसरात खळबळ उडाली असुन या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत .