सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई शहरातील डॉ.घोटवडेकर हॉस्पिटल आणी प्रसाद कंट्रक्शन धर्मपुरी वाई या ठिकाणी आज्ञात चोरट्यांनी घोटवडेकर हॉस्पिटल मधील कंपुटर व इतर किमती साहित्य त्याच बरोबर शैलेंद्र देवकुळे यांच्या प्लेट मधील ३० हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन गेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी गंभीर दखल घेवुन डिबी पथकाला चोरी करणार्यांना गजाआड करण्याचे आदेश दिले होते .
पण या पथकानेही चोरटा शोधण्या साठी वाई शहरातील अनेक भागात छापे टाकले पण तरीही आरोपी सापडत नव्हता .सध्या वाईच्या डिबीचा अवैद्य धंदे शोधून काढुन ते उध्वस्त करण्या साठी हे डिबी पथक वाई शहरातील गल्ली बोळ पिंजून काढत असतानाच पथकाला खबर्या मार्फत माहिती मिळाली की या दोन्ही ठिकाणी झालेल्या चोऱ्या ह्या शेखर ऊर्फ चिंग्या अशोक घाडगे वय ३३ राहणार सोनजाई नगर वाई याने केल्या आहेत .
अशी माहिती प्राप्त होताच हे डिबी पथक त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी शिंदे हायस्कूल परिसरात पथकाने सापळा लावला असता तो त्या सापळ्यातुन निसटून दुचाकी वरून पळून जात असताना पथकाने चित्तथरारक पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याच्या कडुन तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यास डिबी विभागाचे प्रमुख विजय शिर्के महिला हवलदार सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड प्रसाद दुदुस्कर अमित गोळे यांना अवघ्या सहा तासातच यश आल्याने वाईकर नागरीकांनी बाळासाहेब भरणे व टिमचे कौतुक केले आहे.