वाईत डिबीचा ताडीवर वार : २१ हजार रुपये किमतीची १०५ लिटर ताडी केली जप्त

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----   
वाईच्या : प्रतिनिधी 
वाई  पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास  खास खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की वाई पसरणी रोडवरील सिध्दनाथवाडीच्या हद्दीत २१ हजार रुपये किंमत असलेल्या  १ लिटर ताडीने भरलेल्या पिशव्या असलेली सात पोती म्हणजे १०५ लिटर ताडी हि एका पत्र्याचे शेड मध्ये साठा करुन ठेवली आहे. 
        अशी  माहिती प्राप्त होताच बाळासाहेब भरणे यांनी तातडीने डिबी विभागाचे प्रमुख असलेले विजय शिर्के महिला हवलदार सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड प्रसाद दुदुस्कर अमित गोळे यांना बोलावून तातडीने सापळा रचून छापा मारण्याचे आदेश देवून ताडीसह आरोपी ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या .सूचना प्राप्त होताच वरील डिबी पथक वाई पसरणी रस्त्यावर असणार्या सिध्दनाथवाडीत पोहचुन त्या ठिकाणी सापळा लावला आणी खबर्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हे पथक
त्या पत्र्याचे शेड पर्यंत पोहचले त्या वेळी त्या ठिकाणी ताडीच्या पिशव्यांनी भरलेली सात पोती मिळुन आली ति पंचनामा करुन ताब्यात घेतली आणी राजरोस पणे ताडीची विक्री करणारा रामा लक्ष्मण गौड वय ४० राहणार पसरणी रोड सिध्दनाथवाडी वाई यास ताब्यात घेतले आहे .त्याच्या वर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झालेल्या धाडसी कारवाईचे सिध्दनाथवाडीसह
सिध्दनाथवाडीसह वाईकर नागरीकांनी कौतुक केले आहे .
To Top