सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाईच्या पश्चिम भागातील बलकवडी गावचे पोलिस पाटील असलेले विक्रांत आनंदा जाधव आणि त्यांचा मित्र धोंडिबा जाधव या दोघांनी आपसात संगणमत करुन त्याच गावचे रहिवासी व मागासवर्गीय समाजातील असलेले राहुल प्रकाश मोरे यांना वरील दोघांनी जातिवाचक शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने वाई तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेत खळबळ उडाली आहे .
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटच्या टोकाचे गाव असलेले बलकवडी या गावी पोलिस पाटील या पदावर विक्रांत आनंदा जाधव हे काम करतात . दि. १८ |११ | २२ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राहुल प्रकाश मोरे हे बलकवडी या आपल्या गावातील शिवारातील शेता मधून भात शेतीचे काम ऊरकुन आपल्या मित्रा
सोबत घरी येत असताना बलकवडी गावचे कमाणी जवळ गावचे पोलिस पाटील असलेले विक्रांत आनंदा जाधव यांनी बोलावून घेतले व त्यांचा मित्र महेंद्र धोंडिबा जाधव राहणार बलकवडी याने राहुल मोरे पकडले व पोलिस पाटील विक्रांत जाधव यांनी तक्रारदार यांना तु गावातील लहान मुलांना दमबाजी का करतोस तुला लय मस्ती आली आहे काय ? असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. म्हणून राहुल प्रकाश मोरे वय २५ राहणार बलकवडी ता.वाई यांनी पोलिस पाटील विक्रांत जाधव व त्यांचा मित्र महेंद्र धोंडिबा जाधव या दोघां विरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
केली आहे .या तक्रारीची दखल घेऊन वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी बलकवडीचे पोलिस पाटील विक्रांत जाधव आणी त्यांचा मित्र महेंद्र जाधव या दोघांवर पदाचा अतिरेक करुन जाती वाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .