सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम गावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीसीमुळे हवालदिल झालेल्या भूमिहीन गरीब गावकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासन दरबारी मांडण्यात आल्या. याबाबत भूमिहीन व गरीब लोकांना दुसरीकडे पर्यायी जागा नसल्याने त्यांची अतिक्रमणे काढू नये. याबाबत मुरूम ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना सह्यांचे निवेदन दिले आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातच सर्वच गावातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम प्रशासनाने हातात घेतली आहे. याच अनुषंगाने मौजे मुरूम तालुका बारामती जिल्हा पुणे येथील ही अनेक गावकऱ्यांना सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत मुरूम यांच्या वतीने अतिक्रमणे हटवण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या. वास्तविक अनेक धन दांडग्या तसेच मातब्बर मंडळींकडून ही गावात गायरान जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत तसेच कुठलाच पर्याय नसल्यामुळे अनेक गरीब मोलमजुरी करणाऱ्या भूमीहीन गावकऱ्यांनी देखील राहण्याच्या करता गायरान जमिनीवर आपली घरे बांधली यासाठी तात्कालीन प्रशासनाने देखील मदत केली होती तसेच यापैकी अनेकांना महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेचा लाभही मिळालेला आहे आणि यामुळेच आलेल्या नोटीसमुळे सदर गावकरी कारवाईचे भीतीने गर्भगळीत झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे तसेच पंचक्रोशीत या संबंधाने अनेक चर्चांना उधाण आलेला आहे. हा अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आणि परिस्थिती गावातील काही सुजाण युवकांनी बघितल्यानंतर सदर गोरगरीब गावकऱ्यांना विश्वास देऊन किमान तुमच्या भावना आपण शासन दरबारी पोहोचऊ असा दिलासा दिला व आज पुणे येथे मुरूम गावातील शेकडो गोरगरीब भूमीहीन गावकऱ्यांच्या व्यथा निवेदनाच्या माध्यमातून तसेच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांचा संवाद घडवून शासन दरबारी पोहोचवल्या. असल्याची माहिती मुरूम ग्रामस्थांनी दिली.
निवासी कलेक्टर हिम्मतसिंह खराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सदर निवेदन स्वीकारली तसेच या व्यथा आम्हीही शासनापर्यंत पोहोचवू हा विश्वास उपस्थिथ महिला व गावकऱ्यांना दिला.