वाई ! दौलतराव पिसाळ ! प्रतापगडावरील अफजलखान कबर अतिक्रमण हटाव संदर्भात प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले काय म्हणाल्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
गेली २५ वर्षे प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून मिलिंद एकबोटे, विनायक सणस, पंडितराव मोडक,  राजीव मोहिते, पोपट बर्गे, सुनील घाडगे, बाबा चव्हाण व वाई शहरातील तसेच महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त यांना एकत्र घेऊन प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमांतून प्रतापगडावरील अफजलखान थडग्याच्या परिसरांत असलेल्या अनधीकृत बांधकामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यासाठी सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते व प्रतापगड उत्सव समितीने वेळोवेळी आंदोलने केली. वाई शहरातील असंख्य शिवभक्त यांना एकत्र घेऊन प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून प्रतापगडावरील अफजल खान थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवणेबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला.        प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अँडव्होकेट नितीन प्रधान व अँडव्होकेट सौ जयश्री खोत व त्यांच्या सहका-यांच्या माध्यमातून लढा देऊन मुंबईस्थित अफझलखान मेमोरियल ट्रस्टची मान्यता अवैध असल्याचे मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व हा ट्रस्ट रद्द करून घेतला. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात अफजलखान थडग्याशेजारी अनधिकृत बांधकाम आहे, हे वेळोवेळी पुरव्यासह कोर्टाच्या निदर्शना आणून दिले. त्यामुळे प्रतापगड उत्सव समितीने जी आंदोलने व न्यायालयीन प्रक्रिया लढली त्याची दखल घेऊन प्रशासनाला आज त्या ठिकाणी असलेले अधिकृत बांधकाम तोडावे लागले आहे. त्याबद्दल सर्व शिवभक्त व प्रशासनातील महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई व दिल्ली येथे असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व मंत्री महोदयांचे मी प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते,  अशी प्रतिक्रिया प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक वाईतील श्रीमती विजयाताई भोसले यांनी व्यक्त केली आहे.
To Top