सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा - प्रतिनिधी
आत्याच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भाचा नितीन सुनिल झोरे वय २३ रा. सह्याद्री नगर , सांगवी मुरा सध्या रा. जानकर कॉलणी, मंगळवार पेठ, सातारा याने फास लावुन आत्महत्या केल्याची खबर अंकूश बाबुराव ढेबे रा. धोंडेवाडी मेढा ता. जावली यांनी पोलीस ठाण्यात दिली.
दि. ९ रोजी धोंडेवाडी येथे असणाऱ्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नितीन झोरे याने मुक्काम करण्याचा निर्णय घेवुन जेवन करून मला ऑन लाईन क्लास असल्याने मी शेजारी खोलीत झोपतो असे सांगून नितीन झोपयला गेला. त्यानंतर त्याच्या रुमची लाईट सुरु असल्याने मी पहाण्यासाठी गेलो असता नितीनने पट्ट्या्च्या सहाय्याने अँगलला गळफास लावल्याचे दिसुन आले असल्याची माहिती अंकूश ढेबे यांनी पोलीस ठाण्यात दिली असुन सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार माने अधिक तपास करीत आहेत.