बारामती ! .....त्यामुळे नाईलाजस्तव शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे वळतोय : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहकारच जाळं शेतकरी हिताचं आहे. शेतकऱ्यांना सहजरीत्या व कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणारी जिल्हा बँक आहे. असे सांगत शेतकऱ्यांचे वि का सोसायटीत संबंध असतात. पण नाईलाजस्तव जादा पीककर्ज मिळत असल्यामुळे शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे वळत आहे. शेतकऱ्यांची साखर कारखान्यातील पत पाहून जिल्हा बँकेने त्याच्या पीककर्ज वाढ करावी. तसेच मध्यम मुदत देताना इतर खर्चाचा बुर्दंड न बसता कमीत कमी व्याजदरात शेतकऱ्यांना कोणतेही तोशीस न लागणारी योजना राबवावी. असे मत सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.  
          सोमेश्वरनगर ता बारामती येथे पुणे जिल्हा बँक शाखा सोमेश्वरनगरच्या ५४ व्या वर्धापनदिन जगताप बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, विजयकुमार सोरटे, बाबुराव भोसले,आर एन शिंदे, लालासाहेब नलावडे, रघुनाथ भोसले,  शैलेश रासकर, संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, सुनील भोसले, किशोर भोसले, दिग्विजय जगताप, सतीश सकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
           कार्यक्रमात चेतन करचे यांनी प्रास्ताविकात सोमेश्वरनगर शाखेत एकूण २२ हजार २५५ खातेदार असून संस्थेला १२ कोटी नफा झाला आहे. 
१३४ कोटीं ६२ लाखाच्या ठेवी असून
१३४ कोटी ५० लाख कर्ज रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तसेच १४ वि का सोसायट्या बँकेशी संलग्न आहेत. बँकेचे संचालक संभाजी होळकर म्हणाले, जिल्हा बँक ही आशिया खंडात सर्वात मोठी शेतकरी बँक आहे. एकेकाळी ३०० कोटी ठेवी असणाऱ्या बँकेच्या आज ११ हजार कोटी ठेवी आहेत. सोने तारण  गृहकर्जाला ७५ लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जात आहे तर पिककर्जात वाढ करून ते ५२ हजार करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आराखड्यानुसार पीककर्ज ठरत असते. मध्यम मुदत कर्ज १३ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले आहे. परदेशातील शिक्षणासाठी ४० लाखापर्यंत कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत २७ शेतकाऱ्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत.
         रघुनाथ भोसले व काशिनाथ जगताप या जेष्ठ खातेदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, सुनील भोसले, धन्यकुमार जगताप, विजयकुमार सोरटे, बाबुराव भोसले यांनी  बँकेने कर्जाचा व्याजदर कमी करावा. राष्ट्रीयकृत बँकांनी एकरी ८० हजार रुपये पीककर्ज केले आहे. जिल्हा बँकेने ५२ हजारांवरून ७० हजार करावे. चारचाकी गाड्या, शेतीघरे यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे. तसेच कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे आभार निलेश जगताप यांनी मानले. 
-----------------------

------------------
To Top