सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जादा ठेवीच टार्गेट देऊन कर्मचाऱ्यांना खालच्या भाषेत बोललं जातंय. एसीत मध्ये बसून टार्गेट देणारे अधिकारी श्री. शितोळे श्री. हेगडे श्री. कदम व श्री. टापरे यांनाही ठेवीचे टार्गेट द्या. संगणक विभागाला अजून बॅलन्स शीट जुळेना दोन वर्ष सॉफ्टवेअर बदलून झाले. काही सॉफ्टवेअर मध्ये चुका आहेत. संगणक विभागाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विजयकुमार सोरटे यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर ता. बारामती येथे पुणे जिल्हा बँक शाखा सोमेश्वरनगरच्या ५४ व्या वर्धापनदिन सोरटे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, उद्योजक आर एन शिंदे, लालासाहेब नलावडे, रघुनाथ भोसले, शैलेश रासकर, संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, सुनील भोसले, किशोर भोसले, दिग्विजय जगताप , सतीश सकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयकुमार सोरटे पुढे म्हणाले, यावर्षी सोमेश्वरनगर शाखेला १३४ कोटी ठेवींचे टार्गेट दिले होते. वरचे अधिकारी एसीत बसून कर्मचाऱ्यांना शिरवाळ भाषेत बोलतात. खातेदार तेच, ठेवीदार तेच कर्मचारी घरोघरी जाऊन टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकांच्या हातापाया पडतात. दरवर्षी टार्गेट कसे पूर्ण करणार? तरीही कर्मचारी टार्गेट पूर्ण करतात. अधिकाऱ्यांना टार्गेट द्या ना. असा सवाल करून गेली दोन वर्षे झालं बँकेचे बॅलन्ससीट जुळत नाही. बँकेचा आयटी विभाग कुचकामी झाला आहे.
असे सांगत दिवसेंदिवस खातेदारांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे बँक कर्मचाऱ्यांची संख्या घटवत आहे. स्टाफ चांगला द्या, शिक्षेवर आलेले नको. शिक्षेवर आलेल्या स्टाफला वाटतच माझी कोणीतरी तक्रार करावी व बदली व्हावी ही मानसिकता बदलायला हवी.
मध्यम मुदत कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लवकरच भेटणार असल्याचे सोरटे यांनी सांगितले.