बारामती ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी बंद : चार तास कारखाना बंद ठेवत 'सोमेश्वर'चा सहभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 
पुकारलेल्या १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी ऊस तोड बंद आंदोलनाबाबत बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चार तास बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदवला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 
         याबाबत शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनी सोमेश्वर कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २१ व्या ऊस परिषदेमध्ये निर्णय झाल्याप्रमाणे त्याचबरोबर ७ नोव्हेंबरच्या पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ठरल्याप्रमाणे दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन दोन दिवसाचे लाक्षणिक आंदोलन आहे. आमच्या विविध मागण्याकडे केंद्र व राज्य सरकार आणि साखर उद्योगाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे.
       स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१) सन २०२१-२२ हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक २०० रुपये अंतिम भाव मिळावा. व राज्या सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत.
२) राज्य सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अद्यादेशमध्ये केलेली दुरूस्ती त्वरीत मागे घेऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा दुरूस्ती करून एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उताऱ्याच्या आधारावर या सिझन मध्ये म्हणजेच सन २२-२३ च्या हंगामामध्ये एकरकमी एफआरपी द्यावी..
३) ऊस तोडणी मजूर हे स्वर्गीय गोपीथ मुंडे महामंडळामार्फतच मजूर पुरवावेत. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून अथवा कारखान्याकडून महामंडळाने वर्गणी वसुल करू नये
४) केंद्र सरकारने ६० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिलेली आहे. अजून तीस लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. तसेच निर्यातीस कोटा सिस्टिम न लावता ओपन जनरल लायसन (ओजीएल) अंतर्गत जे पहिले निर्यातील त्यांना यात यावे. सरकारने दिलेला कोटा संपेपर्यंत मुक्त परवाना द्यावा.
(५) केंद्र सरकारने साखरेची किंमत ३५०० रूपये प्रतिकिंटल निश्चित करून इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर ५ रुपयांची वाढ करावी...
        या अत्यंत महत्वाच्या अशा केंद्र, राज्य सरकार व साखर उद्योगांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एकजूट दाखविण्यासाठी हे दोन दिवसाचे लाक्षणिक उस तोड बंद आंदोलन पुकारलेले आहे. यातील बऱ्याचशा मागण्या या साखर उद्योगाशी निगडीत आहेत. आणि एकदंरीत रित्या केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव आणला तरच त्यांचा विचार होणार आहे. तेव्हा स्वेच्छेने शेतकरी ऊस तोड बंद ठेवून हे आंदोलन करणार आहेत. आपल्या कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्यावर ऊस तोडणीसाठी तसेच वाहनधारकांवर ऊस वाहतूक करण्यासाठी कोणताही दबाव टाकू नये. अन्यथा आपल्या कारखान्याकडून कसल्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर दोन दिवसाचे लाक्षणिक बंद सोडून बेमुदत ऊस तोड बंद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले होते. या निवेदनाला अनुसरून काल दि १७ रोजी दुपारी चार तास कारखाना बंद ठेवत या आंदोलनात सहभाग नोंदवला.
To Top