छत्रपती कारखाना ! साखर व मळी विक्री बाबतचा अध्यक्ष व संचालक मंडळाने केलेला खुलासा हास्यापद : पृथ्वीराज जाचक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भवानीनगर : प्रतिनीधी
भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या साखर व मळी विक्रि बाबतचा अध्यक्ष व संचालक मंडळाने केलेला खुलासा हास्यापद व काररवान्याच्या हितास बाधा आणणारा असल्याचे शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले
            श्री छत्रपती काररवान्या त २००३ साला पासून वेगवेगळी राजकीय नाटय घडामोडी ची स्पर्धा सुरू झाली आहे गतवर्षी साडे बारा लाख टन ऊस गाळप होऊन सुद्धा कारखाना ऊर्जित अवस्थेत येत नाही त्यामुळे या सर्व प्रकार ची चौकशी कलम ८३ अन्वये करण्याची मागणी भवानीनगर च्या शेतकरी कृती समिती च्या वतीने करण्यात येणार आहे तसेच तोडणी वाहतूक साठी वाटप केलेल्या ४१ कोटी रुपया बाबत ची चौकशी करणार असल्याचे जाचक यांनी सागितले. गेले दोन वर्षापुर्वी मी छत्रपती कारखान्याचे मिटींगला हजर असताना साखर निर्यातीसंबंधीचे केंद्राचे धोरण जाहीर झालेले होते व त्यामुळे आता सारखे भाव वाढलेले नव्हते मात्र या संचालक मंडळांनी केंद्राचे साखर धोरण जाहीर झालेले नसताना मळी व साखर विक्री केली त्यावेळी मी कारखान्यांना व  सहकार आयुक्त यांना पत्र देऊन सदर ची विक्री थांबवण्याची विनंती केली होती . मळी व साखर आगाऊ विक्री केल्याचे सांगितले जाते यामध्ये कमी भावात विक्री करण्यास मी प्रतिबंध केल्याचे का सांगितले जात नाही किंबहुना माझा विरोध कोणाच्यातरी आर्थिक हिताच्या आड येत असल्यामुळेच मला मिटिंग मध्ये बसण्यात पाच तज्ञ संचालकानी विरोध केला ही बाब सभासद जाणून आहेत. मळी व साखरे ची आगाऊ विक्री केल्याशिवाय या हंगामाचे पेमेंट देता येत नव्हते तर मग साखरेवर व्यापाराकडून शंभर टक्के उचल घेऊन एक रक्कमी देता आले नसती का ? असा सवाल जाचक यांनी केला आहे .शिवाय जिल्हा बँकेकडून पैसे न घेतल्यामुळे व्याजाचा भूर्दंड बसला नसता. जिल्हा बँकेने यापूर्वी कार्यक्षेत्र सोडून इतर कारखान्यांना मदत केली आहे मगच आता रिझर्व बँकेचे नियम का आठवतो असाही टोला ही लगावला. नवीन प्रकल्प आहे तर त्याची परतफेड करण्यासाठी आठ आठ वर्ष लागत नसतात यांची अध्यक्ष व संचालक मंडळानी नोंद घ्यावी कारखान्याच्या या कारभाराबाबत खुली जाहिर चर्चा करण्याचे आवाहन ही जाचक यांनी केले आहे. त्या पाच तंज्ञ संचालक समवेत चर्चा करू यासाठी संचालक मंडळाने तारिख व ठिकाण ठरावेत असे सागुन केलेली आगाऊ साखर व मळीची विक्री फायद्याची असल्याचे अध्यक्ष सागत आहेत तर तो नेमका फायदा कोणाचा असा सवाल जाचक यांनी केला आहे
To Top