छत्रपती कारखाना ! प्राप्त परिस्थितीचा विचार करून संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्य : अध्यक्ष प्रशांत काटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भवानीनगर : प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या साखर व मळी विक्री बाबत केलेले आरोप हे वस्तूस्थितीचा विप्रयास करणारे असून त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करून साखर व मळी विक्री बाबत संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली .  
        या वर्षीचा गळीत हंगाम  सुरू करण्यापूर्वी मेंटेनन्स ची कामे, ऊस तोडणी वाहतूक, मशनरी ओव्हर लिंग, केमिकल, बारदाना , कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादीसाठी जवळपास ४७ कोटी रुपयांची आवश्यकता होती त्याकरता संचालक मंडळांनी बँकाकडून रक्कम उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हा बँकेने सुद्धा जेवढी मदत करता येईल तेवढी मदत कारखान्याला केली आहे रिझर्व बँकेच्या निर्बधा मुळे  बँकेकडून एवढी मोठी रक्कम विनातारण उपलब्ध होऊ शकत नसल्याने संचालक मंडळाने साखर व मळी विक्री करण्याचा निर्णय घेतला .ही रक्कम गेली दोन ते तीन महिन्यापासून कारखाना बिनव्याजी वापरत आहे यामध्ये काररवान्याचा फायदा झाला आहे . सदरची रककम बॅकेकडून घेतली असती १२ टक्के व्याज भरावे लागले असते. मळी व साखर विक्री चा निर्णय घेतला नसता तर गळीत हंगाम सुरु करण्या साठी अडचणी निर्माण झाल्या असत्या मागील दोन हंगामातही आपण तसाच पद्धतीने निर्णय घेतले होते त्यामुळे आपल्याला गळ्यात हंगाम घेता आले व उंच्चाकी गाळप करता आले . मळी व साखरेची आता बाजार भाव वाढले असून साखर व मळीच्या आगाऊ विक्री केल्यामुळे कारखान्यात तोटा झाला असा आरोप करण्यात येत आहे .शेवटी बाजारपेठेत चढ - उतार होत असतो. पाठीमागे संचालक मंडळाच्या सभेत जाचक हे उपस्थित राहत होते त्यावेळी हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्यास पैशाची आवश्यकता होती त्यावेळी बँकेकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने जाचक यांच्या संमतीने मळीची आगाऊ विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता .             त्यावेळी जाचक यांनी पैशाची उपलब्ध होत नसेल तर तेवढ्या पैशाची आवश्यकता आहे तेवढ्याच प्रमाणात मळीची आगाऊ विक्री करावी अशी सूचित केले होते. साखरेचे दर वाढल्याचे कारण देऊन काही साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे करार मोडले असते त्या कारखान्यांनी प्रति क्विंटल १०० / प्रमाणे ई.एम.डी. घेऊन करार केले आहेत .परंतु आपल्या छत्रपती कारखान्याने प्रतिक्विंटल अकराशे १,१०० / रुपये याप्रमाणे ई एम डी  घेतली आहे असे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले .
To Top