मेढा ! ओंकार साखरे ! ऐकावं ते नवलंच...! वाहन मेढ्यात उभे...आणि दंड फाडलाय यूपी पोलिसांनी... गीता लोखंडे यांच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि सर्वच चक्रावतात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे 
वाहनधारकांनो सावधन ! आता कधी ही आणि कोठेही आपल्या खिशाला चाट बसु शकते. आपला खिसा ट्राफीक पोलीसामुळे खिसा रिकामा होवु शकतो हे ध्यानात घेणे गरजेचे झाले आहे. नुकताच असा प्रकार मेढा तालुक्यातील जवळवाडी येथील गीता लोखंडे यांच्याबाबत घडला आहे. 
                 घडले तसेच मेढा या तालुक्यात असलेल्या जवळवाडी येथिल रहिवाशी श्रीमती गिता लोखंडे यांचे मालकीची मोटार कार नं. एम एच ११ बी व्ही ४५५९ ही गाडी स्व:ताच्या घरी उभी असताना अचानक उत्तर प्रेदशात जमलपूर मध्ये क्रॉसिंग पॉईटवर गाडी चालवताना सेप्टी बेल्ट लावला नसल्याचे १ हजार रुपयाचे चलान त्यांचे नावे पडले आहे.
          १३३  मोटार वाहन अधिनियम १९८८ चे उल्लघंन केले असल्याचे चलानचा मॅसेज येताच वाहन मालकांना चक्कर आली. दि. १७ रोजी १ वा २४ मि.  उत्तर प्रदेशात श्रीमती लोखंडे या गेल्या नसताना चालान नं. युपी ४६५८२७७२२१११८१०४१६२ क्रमांकानुसार एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे हा झालेला दंड त्यांनी उत्तर प्रदेशातील एसपी ट्राफीक कार्यालय अलीगढ येथे हजर राहुन भरायचा आहे म्हणजे चार आण्याची कोंबडी अण १२ आण्याचा मसाला अशी गत होवुन बसली आहे.
             सध्या वाहन धारकांना स्पिडगनचा नाहक त्रास करावा लागत असताना आरटीओ कडून हा नविन मनस्ताप आता सहन करावा लागणार आहे. बोगस नंबर प्लेट लावुन प्रवास करणारांमुळे हा सामान्य माणसाला त्रास होणार आहे. आरटीओ कार्यालनाने वाहन धारकाला दंड करताना किमान त्या गाडीची खात्री करणे गरजेचे आहे. चलानवर येणारा गाडीचा फोटो व आरटीओ कार्यालयातील फोटो पहाणे गरजचे आहे. ₹
To Top