सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तसेच विविध क्रीडा प्रकारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून क्षेत्रीय तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठाच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास यावर्षी या क्षेत्रीय स्पर्धांचे आयोजन करण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत मिळाला.
क्रीडा प्रकारातील सर्व वजन गटातील कुस्तीपटूंच्या स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. अतिशय चांगल्या प्रकारचे आयोजन कुस्ती स्पर्धांसाठी करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मोहन खोपडे तसेच कुस्तीगीर संघामार्फतच या सामन्यांचे पंच म्हणून राजेंद्र वरे, तुषार गोळे, ज्ञानेश्वर खोपडे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमासाठी राजगड ज्ञानपीठाच्या डिग्री इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. बी. पाटील, राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पसचे इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे,नोंदणी अधिकारी गोरख जगताप महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख चेतन शिवतरे यांनी या स्पर्धांसाठी मुख्य समन्वयक म्हणून कामगिरी पार पाडली स्पर्धांमधून विजेत्या होणाऱ्या स्पर्धकांची निवड पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक हेमंत खंडाळे यांनी केले तर अमोल खेसे यांनी सर्व मान्यवरांचे तसेच खेळाडूंचे आभार मानले.
.