सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या यात्रेत भोर विधानसभा मतदारसंघातील हजारो तरुण निष्ठावंत कार्यकर्ते घेऊन आमदार संग्राम थोपटे सामील होऊन पदयात्रेस सुरुवात केली.
भोर तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या पावलावर पाऊल ठेवून संग्राम थोपटे हे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी अनेक वर्षांपासून काम करीत असून भारत जोडो यात्रेला बळ मिळावे म्हणून भोर - वेल्हा-मुळशीचे आमदार तसेच पुणे शहराचे काँग्रेस प्रतोद संग्राम थोपटे यांनी आघाडी घेतली असून कार्यकर्त्यांचे बळ राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे हे हजारो कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रेत सामील झाले आहेत.भोर तालुक्यातून १७ नोव्हेंबरला अकोला येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार थोपटे कार्यकर्त्यांसह एकत्र जमा होऊन १८ नोव्हेंबरला पदयात्रेस सुरुवात केली.