सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
शेते, मेढा आणि दरे याठिकाणी मेढा पोलीसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी धाडी टाकून ९ हजार २०५ रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असुन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येवुन दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे नोटीशी बजावण्यात आल्या असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी अनिल जग्गनाथ जाधव वय -50 वर्षे रा. सोमर्डी हा
मौजे शेते गांवचे हद्दीतील सोमर्डी ते पाचगणी जाणारे रोडलगत शेते गावच्या हद्दीत लिबांच्या झाडाच्या आडोशाला बेकायदेशीर दारू विक्री करताना सापडला असुन त्याच्या कडून 2 हजार 835 रु. किं.च्या देशी दारुच्या 81 प्लास्टिकच्या सिलबंद बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
तसेच आरोपी सनि विकास कासुर्डे वय 20 वर्षे रा. मेढा हा मौजे मेढा गांवचे हद्दीतील निकम आळी आनंदा नारायण निकम यांचे घराचे आडोश्याला दारु विक्री करीत होता . त्याच्या कडून
5 हजार 040 रु. किंमतीच्या 72 काचेच्या सिलबंद बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या.
तसेच आरोपी सहदेव यदु साळुखे वय -45 वर्षे रा. पदमुले मुरा हा मौजे दरे बु ते करंडी जाणारे रोडलगत - बु पाईप लाईन शेजारी आडोशाला 1 हजार 330 रु. किंमतीच्या 19 काचेच्या सिलबंद बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या असुन हे सर्वजण प्रोव्हीचा मुद्देमाल बेकायदेशीर बिगरपरवाना स्वताच्या आर्थीक फायद्याकरीता चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत मिळुन आला असल्याने सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शना खाली पो.हवा. शेख, गायकवाड आणि माने हे अधिक तपास करीत आहेत.