सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
२२ वी नॅशनल पॅरास्वीमिंग चॅम्पियनशिपस् स्पर्धा दि ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान आसाम ची राजधानी गुवाहाटी मध्ये नुकतीच संपन्न झाली. पॅरालॉम्पिक कमिटी ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या ह्या देशपातळीवरील स्पर्धेत वाणेवाडी ता. बारामती गावच्या अजय हिंदुराव भोसले याने पुरुष विभागात ५० मीटर फ्रिस्टाईल स्विमिंग मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दुसरा नंबर पटकावत रौप्यपदक प्राप्त केले.
डेक्कन जिमखाना टिळक टॅंक पुणेचे सचिव अमित गोळवलकर यांनी अजयला मोफत टॅंक ची सुविधा तसेच मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले . तेथे प्रशिक्षक स्वोजस गोडसे यांनी अजयला मोलाचे मार्गदर्शन केले .त्याच्या यशात अमित गोळवलकर, स्वोजस गोडसे यांचे साहाय्य मोलाचे ठरले . मिळवलेल्या या यशाबद्दल साद संवाद स्वच्छता ग्रुप वाणेवाडी , ग्रामस्थ वाणेवाडी व सोमेश्वर परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी आनंद व्यक्त करीत आहेत .